एकाच सामन्यात जुळ्या भावांनी एकमेकांची घेतली विकेट


क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कुठलीही अपेक्षा बाळगणे चुकीचेच म्हटले पाहिजे. कोणत्या सामन्यात कधी काय होईल याचा प्रेक्षकांना कधीच अंदाज येत नाही आणि हीच या खेळाची खुबी आहे. नुकत्याच झालेल्या एका कौंटी सामन्यात तेथे उपस्थित प्रेक्षकांना एक अनोखा चमत्कार अनुभवता आला. या सामन्यात दोन संघाकडून एकमेकाविरोधात खेळत असलेल्या जुळ्या भावांनी एकमेकांना आउट केले आणि तेही एलबीडब्ल्यू.

हा इंग्लंड कौंटी सामना लँकशायर विरुद्ध लीसेस्टशायर या दोन संघात सुरु आहे. चार दिवसाच्या या सामन्यात बुधवारी कॅलन पार्कसन याने लीसेस्टशायर कडून खेळताना त्याचा जुळा भाऊ मॅट याला आउट केले आणि जणू वचपा काढला. कॅलनने लँकशायरकडून खेळत असलेल्या मॅटला ४ धावणार एलबीडब्ल्यू केले आणि क्रिकेट खेळात नवीन चमत्कार घडला. कारण पहिल्या पारित मॅटने कॅलीन याला २९ धावांवर एलबीडब्ल्यू आउट केले होते.

Leave a Comment