बॉयफ्रेंडसोबत या अवतारात दिसली कृष्णा श्रॉफ


सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफची गणती केली जाते. टायगर आपल्या अ‍ॅक्शन, स्टंट आणि डान्स मूव्ह्समुळे सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे. पण सिनेसृष्टीपासून जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा चार हात लांबच आहे. पण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कृष्णा कमी ग्लॅमरस नाही. सोशल मीडिया अकाउंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतील. तसेच कृष्णा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.


नुकतेच काही फोटो कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या जे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर फिरताना या फोटोंमध्ये दिसत आहेत. यात ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये कृष्णाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. बॉयफ्रेंड एबन हायम्सचा तिने हात पकडला असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.


अशाप्रकारे बॉयफ्रेंडसोबत बोल्ड फोटो शेअर करण्याची कृष्णाची ही पहिलीच वेळ नाही. कृष्णा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे किस करतानाचे फोटो याआधीही व्हायरल झाले होते. कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Island baby 🦋🌺💚☀️🏝🍉

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


त्याचबरोबर एबनने सुद्धा काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, त्याने ज्यामध्ये कृष्णाला वाइफ म्हणत या स्टोरीमध्ये तिला टॅग सुद्धा केल्यामुळे हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. पण या दोघांनीही याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment