हा आहे गुगलचा अनभिज्ञ तिसरा सह-संस्थापक

जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगलचा आज जन्मदिवस आहे. आज गुगलला 21 वर्ष झाली आहेत. हा दिवस साजरा करण्यासाठी गुगलने स्वतःचेच डुडल बनवले आहे.

अनेक जणांना वाटते की, गुगलची स्थापना दोन जणांनी मिळून केली होती. मात्र तसे नाहीये. गुगल बनवण्यामध्ये तीन व्यक्तींचा हात आहे. मात्र त्या व्यक्तीला संस्थापकांच्या यादीत स्थान मिळाले नाही.

(Source)

आजपासून 23 वर्षांपुर्वी जानेवारी 1996 मध्ये गुगल एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले होते. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला होता. जगभरात आज त्यांना गुगलचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. मात्र त्यांच्याबरोबरच आणखी एक व्यक्ती जोडलेली होती. हे तिघेही पीएचडीचे विद्यार्थी होते.

(Source)

त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव स्कॉट हसन आहे. स्कॉट या रिसर्च प्रोजेक्टचा ओरिजिनल लीड प्रोग्रामर होता. गुगलसाठी अनेक कोड स्कॉटने लिहिले आहेत.

(Source)

एक कंपनी म्हणून गुगलची सुरूवात 1998 मध्ये झाली. रिसर्च प्रोजेक्ट पुर्ण झाल्यावर आणि गुगल कंपनी म्हणून स्थापन होण्यापुर्वीच स्कॉटने गुगल सोडले होते. स्कॉटला रोबोटिक्समध्ये करिअर करायचे होते. 2006 मध्ये स्कॉटने विलो गॅराज नावाची कंपनी सुरू केली.

(Source)

गुगलचे डोमेन नाव 15 सप्टेंबरला 1997 मध्ये रजिस्टर करण्यात आले होते आणि कंपनी 1998 मध्ये सुरू झाली. सुरूवातीला लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी कॅलिफोर्नियातील आपल्या एका मित्राच्या गॅरेजमधून गुगलची सुरूवात केली. त्यांनी स्टॅनफोर्डमध्ये शिकणारा विद्यार्थी क्रेग सिल्वर्स्टनला पहिला कर्मचारी म्हणून नियुक्त केले.

 

Leave a Comment