फेसबुकशी आयसीसीची हातमिळवणी


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने गुरूवारी सोशल मीडिया कंपनी फेसबुकबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत भारतीय उपखंडात फेसबुककडे आयसीसी स्पर्धेचे ‘एक्सक्लूझिव डिजिटल कॉन्टेंट’अधिकार असतील. 4 वर्षांच्या या करारामध्ये फेसबुकवर आयसीसी स्पर्धेच्या हायलाईट्स, सामन्यांसंबंधीत किस्से इत्यादी व्हिडीओ बघायला मिळतील. 2023 पर्यंत आयसीसी आणि फेसबुकमध्ये हा करारा राहणार असून, युजर्स फेसबुक अॅपवर क्रिकेटचा आनंद घेऊ शकतील.

2013 चा आयसीसी वर्ल्डकप 4.6 अब्ज लोकांनी डिजिटल माध्यमातून बघितला होता. आयसीसीचे चीफ एग्झिक्यूटिव मनू स्वाहने सांगितले की, आम्ही फेसबुकचे क्रिकेट जगतात स्वागत करतो. जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आणि जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मिश्रण क्रिकेटसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

भारतातील फेसबुकचे वॉइस प्रेसिडेंट अजित मोहन म्हणाले की, आम्ही या भागीदारीमुळे उत्साहित आहोत. या करारामुळे आयसीसीच्या स्पर्धेमधील सामने फेसबुकवरही बघता येतील.

2019 ते 2023 या चार वर्षात आयसीसीच्या अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये महिला टी20 विश्वचषक 2020, आयसीसी पुरूष टी20 विश्वचषक 2020, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2021, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2021, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 या सारख्या अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत.

Leave a Comment