अन् दलाई लामांनी ओढली रामदेव बाबांची दाढी

दिल्लीमध्ये सर्वधर्म सद्भाव संगमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव आणि मौलाना महमूद मदनी एकाच मंचावर हजर होते. मंचावर दलाई लामा एकावेगळ्याच अंदाजात दिसले. त्यांनी प्रेमाने बाबा रामदेव यांची दाढी देखील ओढली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(सौजन्य – वनइंडिया)

या व्हिडीओमध्ये दलाई लामा हे बाबा रामदेव यांची दाढी ओढताना दिसत आहेत. यावेळी दलाई लामा बाबा रामदेव यांना काहीतरी सांगत देखील आहेत व अनेकदा दाढी ओढतात. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना दलाई लामा म्हणाले की, नेत्यांबरोबरच प्रत्येकाने पर्यावरणावर लक्ष दिले पाहिजे. काही तंज्ञानुसार पुढील सात-आठ दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगची समस्या अधिक गंभीर होणार आहे. यामुळे आपल्याला पर्यावरणावर लक्ष दिले पाहिजे.

Leave a Comment