चक्क टाकाऊ प्लास्टिकपासून बनवला जाता आहे रस्ता

बंगळुरू येथे प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यात आला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरण्यात येणाऱ्या दुधाच्या पिशव्या व इतर खराब प्लास्टिकचा वापर बंगळुरूमध्ये रस्ता बनवण्यासाठी केला जात आहे. एक टन प्लास्टिकमध्ये एक किलोमीटरचा रस्ता बनवण्यात येत आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळच्या दुसऱ्या टर्मिनलच्या समोर बनवण्यात येणाऱ्या रोडमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे.

प्लास्टिकला बीटोंमेन आणि दगडांच्या तुकड्यांबरोबर एकत्र करण्यात आले आहे. यात 7 टक्के प्लास्टिक आणि 93 टक्के बीटोमेंन आणि दुसऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

एक किलोमीटर रोडसाठी एक टन प्लास्टिक कचऱ्याचा वापर होतो. दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या त्याचबरोबर बिस्किट, चॉकलेट रॅपर आणि दुसऱ्या वस्तूंचा प्लास्टिक कचरा साफ करून त्यांना मशीनमध्ये बारीक केले जाते. त्यानंतर गरम भट्टीमध्ये बीटोमेन, दगड व इतर दुसऱ्या वस्तूंबरोबर प्लास्टिक एकत्र केली जाते.

बंगळुरूमध्ये याआधी देखील प्लास्टिकचा वापर करून रोड बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्न यशस्वी झाला होता. त्यातून दिसून आले होते की, प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आलेल्या रस्त्यात खड्डे देखील जास्त पडत नाहीत. तसचे, इतर रोडच्या तुलनेत प्लास्टिक वापरून केलेल्या रोडसाठी कमी खर्च लागतो. प्लास्टिकचा वापर करून रोड बनवणे एक चांगला पर्याय आहे. यामुळे पर्यावरण देखील सुरक्षित राहते व प्लास्टिक कचऱ्यापासून देखील सुटका होते.

Leave a Comment