यामुळे लष्कराचा ‘जारी’ कुत्रा सोशल मीडियावर झाला हिरो

भारतीय सैन्याच्या बाहदुरीचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. देशासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचे कितीही कौतूक केले तरीही कमीच आहे. मात्र भारतीय सैन्यातील एका कुत्र्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर भारतीय सैन्यातील एक कुत्रे हिरो ठरले आहे.

भारतीय सैन्यातील ट्रॅकर कुत्रा ‘जारी’ने आसामच्या पनबारी रिझर्व्ह फॉरेस्ट येथे लपवण्यात आलेला हत्याराचा साठा, स्फोटके शोधण्याचे काम केले आहे. जारीच्या या कामगिरीमुळे त्याचे जोरदार कौतूक केले जात आहे.

जारीने नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या सदस्यांनी लपवलेल्या हत्यांराचा साठा शोधून काढला. आसाम पोलिस आणि एएसबीच्या 54 बटालियनने मिळून पनबारी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये सर्च ऑपरेशन केले. या वेळी जारीने सैन्याला हत्यारे, स्फोटके शोधून देण्यास मदत केली.

इस्टर्न कमांड ऑफ द इंडियन आर्मीच्या ट्विटरवरून या घटनेची माहिती शेअर करत जारीच्या कामाचे कौतूक करण्यात आले.

सोशल मीडिया युजर्सने देखील जारीच्या या कामगिरीचे भरभरून केले आहे.

या सर्च ऑपरेशनमध्ये सैन्याने 20 रायफल, 56 7.64 AK सीर्ज गोळा-बारूद, 20 स्नायपर, 83 काडतूस, चार पिस्तॉल मॅग्झिन, 17 किलो स्फोटके आणि रेडियो सेट जप्त केले.

Leave a Comment