एम्सची ही मशीन माफक शुल्कात देते अनुवांशिक आजाराची माहिती

केवळ 20 रूपयांमध्ये आता घामाची तपासणी करून अनुवांशिक आजाराबद्दल माहिती मिळवता येईल. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) गेल्या 20 वर्षांपासून स्वदेशी मशीनचा वापर करून सिस्टिक फायब्रोसिस सारख्या दुर्मिळ आजाराची तपासणी करत आहे. जगभरातील वैज्ञानिक एम्सच्या या मशीनबद्दल समजल्यावर आश्चर्यचकित झाले आहेत. एम्सने ही मशीन प्रदर्शनासाठी देखील ठेवली आहे.

एम्समधील बालरोग विभागाचे डॉ. एसके काबरा सांगतात की, सिस्टिक फायब्रोसिस हा एक अनुवांशिक आजार आहे. परदेशामध्ये या सारख्या आजाराच्या तपासणीसाठी 10 ते 15 लाख रूपयांची मशीन आहे.

भारतामध्ये खाजगी क्लिनिकमध्ये या आजाराच्या तपासणीसाठी 5 हजार रूपये घेतले जातात. मात्र एम्समध्ये स्वदेशी मशीनवर तपासणी करण्यासाठी केवळ 20 रूपये घेतात. जवळपास 700 लहान मुले या आजारमुळे एम्समध्ये उपचार घेत आहेत. दरवर्षी 600 रूग्णांची या मशीनद्वारे तपासणी केली जाते.

डॉक्टरांनुसार, रूग्णाच्या घामामध्ये क्लोराइडचे प्रमाण किती आहे. यावरून आजाराची माहिती मिळते. एक हजार रूपयांच्या स्वीट क्लोराइट टेस्ट मशीनमध्ये एमीमीटर आणि रेग्युलेटर लावण्यात आला आहे. एमीमीटरच्या नेगेटिव आणि पॉजिटिव इलेक्ट्रो हाताला लावण्यात येतात.

या तपासणीमध्ये मिथाइल, अल्कोहल, मिलीक्यू वॉटर, फिल्टपेपरचा देखील वापर केला जातो. आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक तपासण्या या मशीनवर झाल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये वैज्ञानिकांनी एम्सच्या या मशीनला जगातील सर्वोत्तम मॉडेल म्हटले आहे.

Leave a Comment