सौदी अरेबिया पहिल्यांदाच देणार पर्यटन व्हिसा

सौदी अरेबिया आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदाच पर्यटन व्हिसा देणार आहे. याबाबतची घोषणा सौदी शासनाना जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने केली. सौदी अरेबियाने तेलावर निर्भर न राहता अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. देशातील पर्यटन वाढवणे हे क्राउन प्रिंस सलमान यांचे व्हिजन 2030 कार्यक्रमातील एक टप्पा आहे.

पर्यटनमंत्री अहमद अल-खातिब म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना सौदी अरेबियात येण्यासाठी व्हिसा देणे ही देशासाठी नक्कीच ऐतिहासिक गोष्ट आहे. पर्यटकांना येथे येऊन नक्कीच आनंद होईल.

याआधी सौदी अरेबिया केवळ परदेशात नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाला आणि मक्का-मदिनाला जाणाऱ्यांसाठी व्हिसा देत असे.

सौदी अरेबियाने 49 देशातील पर्यटकांसाठी ऑनलाइन पर्यटन व्हिसा अर्ज सुरू केले आहेत. यामध्ये परदेशी नागरिकांना नियमांमध्ये सूटही देण्यात आली आहे. परदेशी महिलांसाठी असलेले कडक ड्रेस कोड नियम रद्द केले आहेत. यामुळे महिला ‘अबाया’ (चेहरा झाकणारे कापड) परिधान न करता फिरू शकतील. मात्र त्यांना योग्य कपडे परिधान करावे लागतील.

2030 पर्यंत वर्षाला 100 मिलियन पर्यटक भेट देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2017 मध्ये सौदी शासनाने 50 आयलँड आणि लक्झरी रेसॉर्ट्ससाठी लाखो डॉलर्सची घोषणा केली होती.

 

 

Leave a Comment