शम्मी कपूर यांनी सुरु केला होता पहिला युट्युब चॅनल


आज सोशल मिडीयाची वाढती ताकद आणि अधिकाधिक लोकांपर्यंत सहज आणि वेगाने माहिती पोहचविण्याची त्याची क्षमता सर्वसामान्य जनतेलाही चांगलीच कळली आहे. त्यामुळे अश्या माध्यमांचा उपयोग सेलेब्रिटी, कलाकार, राजकीय नेते न करतील तरच नवल. त्यातही बॉलीवूड कलाकार आपले चाहते आणि रसिकांशी त्यांच्या खासगी जीवनातील घटना शेअर करण्यास प्राधान्य देत आहेत असेही दिसून येत आहे. त्यासाठी स्वतःचा युट्युब चॅनल सुरु करण्याची जणू नवी स्पर्धा सुरु झाली आहे.

नुकतेच आलिया भट्ट, वरूण धवण, शिल्पा शेट्टी, अजय देवगण, प्रियांका चोप्रा अश्या अनेक कलाकारांनी त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनल सुरु करून आपल्या चाहत्यांशी थेट संवाद सुरु केला असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही मुहूर्तमेढ रोवणारा पहिला कलाकार वेगळाच आहे आणि विशेष म्हणजे तो या नव्या पिढीतला नाही.

कपूर घराण्यातील विशेष गाजलेला आणि त्या काळातला विशेष डान्स स्टाईलने नेहमी चर्चेत राहणारा कलाकार शम्मी कपूर याने त्याचा स्वतःचा ट्यूट्यूब चॅनल २००७ साली लाँच केला होता याची माहिती अनेकांना नसेल. युट्यूबची सुरवात झाली २००५ साली आणि त्यानंतर दोन वर्षाने शम्मीने त्याचा चॅनल सुरु केला होता. मात्र या चॅनलवर त्याने २०१० पासून व्हिडीओ आणि त्यांची अन्य माहिती अपलोड करायला सुरवात केली होती.

Leave a Comment