वारांगणेच्या भूमिकेत झळकणार बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री


सध्या टिपिकल आशयांचे चित्रपट तयार करण्यापेक्षा थोड्या हटके आणि वेगळ्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती करण्यावर बॉलिवूडमध्ये भर दिला जात आहे. त्याद्वारे सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलिवूडच्या एका चित्रपटात ‘सेक्स वर्कर’ हा विषय लवकरच थोड्याशा हटके प्रकारे हाताळला जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ असे असून बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री या चित्रपटात वारांगणेची भूमिका साकारणार आहे.


आपल्या दमदार अभिनयासाठी अभिनेत्री ऋचा चढ्ढा ओळखली जाते. तिचा नुकताच ‘सेक्शन 375’ चित्रपट रिलीज झाला ज्यात एका वकिलाच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ऋचा आता ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ चित्रपटात सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ऋचाची या चित्रपटातील भूमिका खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. या चित्रपटात ती एका कमर्शिअल सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी ऋचाने तयारी सुद्धा सुरू केली आहे.


ऋचा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत म्हणाली, अनुभव सिन्हा यांचा हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी असणार आहे. प्रत्येक प्रकारची भूमिका सध्या साकारावी याकडे माझा कल आहे. मी यातून माझ्या क्षमता तपासून पाहत आहे. अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटासाठी मी कॉमेडी करत आहे. सोफी नावाच्या एका मुलीची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. जी बोलताना सतत अडखळत असते, जिच्या शब्दांचे उच्चार स्पष्ट नसतात.


अनुभव सिन्हा यांचा ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ मध्ये मी एका क्रेझी मुलीची भूमिका साकारत आहे. कॉमेडी मला खूप आवडते आणि मी काम करताना खूप एंजॉय सुद्धा करते. अनेकदा मी कॉमेडी करताना अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करते.

Leave a Comment