भारताला हवेत असे प्रशासकीय अधिकारी


प्रशासन हा कोणत्याची देशाचा अतिशय महत्वाचा भाग. प्रशासन उत्तम असेल तर देशाचा विकास आणि प्रगती वेगाने होणारच. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक आयएएस अधिकारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मेघालयच्या वेस्ट गारो हिल्स मध्ये उपायुक्त पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी रामसिंह असे एक आदर्श अधिकारी म्हणून जनतेच्या मनात स्थान मिळवून आहेत.

२४ सप्टेंबरला ट्विटरवर रामसिंह यांच्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली गेली आहे. त्यात दर आठवड्याला रामसिंह पाठीवर बांबूची टोपली बांधून १० किमीवर असलेल्या बाजारात चालत जाऊन आठवड्याची भाजी आणतात. ही भाजी स्थानिक लोकांकडून ते खरेदी करतात आणि त्याचे पैसे चोख देतात. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या भाज्यांना त्यांची विशेष पसंती असते.

रामसिंह याचे फोटो फेसबुकवर सुद्धा शेअर केले गेले आहेत. यातून रामसिंह देशातील जनतेला प्लास्टिक मुक्त भारत याचा संदेश देतात. ते वापरतात ती टोपली स्थानिक लोकांनीच बनविलेली आहे. ईस्ट मोजो वेबसाईटवर बोलताना रामसिंह सांगतात, चालणे हा उत्तम व्यायाम आहे आणि लोकांना त्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मी १० किमी चालत जाऊन भाजी खरेदी करतो. त्याचे दुसरे फायदे म्हणजे वाहतूक कोंडी होत नाही आणि टोपली वापरली तर प्लास्टिकचा वापर कमी होतो. गेले सहा महिने ते हा उपक्रम करत आहेत.

रामसिंह यांना सायकलिंग करणे आवडते तसेच ते मॅरेथोन रनर आहेत. सर्वसामान्य लोकांच्यात ते सहज मिसळतात, कुठल्याही टपरीवर पदार्थांचा आस्वाद घेतात, स्थानिक लोकांसोबत त्यांना अनेकदा शेतात, जंगलात काम करताना पाहिले गेले आहे.

Leave a Comment