आता झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंकेचा संघ येणार भारत दौऱ्यावर


नवी दिल्ली – झिम्बाब्वेचा संघ पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतीय दौऱ्यावर येणार होता. पण, झिम्बाब्वे संघावर आयसीसीने घातलेल्या बंदीचा विचार करता झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंकेला बीसीसीआयने दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आहे. भारतीय दौऱ्याची श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानेही तयारी दर्शवली आहे.

झिम्बाब्वेचा संघ जानेवारीमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौऱ्यावर येणार होता. पण झिम्बाब्वेवर आयसीसीने बंदी घातल्याने श्रीलंकेला बीसीसीआयने भारतीय दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही यासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, भारताच्या या दौऱ्यात श्रीलंका संघ ५ जानेवारी ते १० जानेवारी या काळात ३ टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटी येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदौरला, तर तिसरा सामना १० जानेवारीला पुण्यात होईल.

Leave a Comment