केवळ 7,999 रूपयांमध्ये मिळणार या कंपनीचा स्मार्ट टिव्ही

इलेक्ट्रॉनिक कंपनी शिंकोने भारतात आपला नवीन टिव्ही लाँच केला आहे. या टिव्हीचा मॉडेल नंबर SO328AS असून, या स्मार्ट टिव्हीची किंमत केवळ 7,999 रूपये आहे.

स्मार्ट टिव्हीबरोबरच कंपनीने टिव्हीसाठी UNIWALL युजर इंटरफेस देखील दिले आहे. शिंकोच्या या स्मार्ट टिव्हीची विक्री 29 सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर सुरू होईल. शिंकोचा हा स्मार्टटिव्ही मेड इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आला आहे.

(Source)

शिंको SO328AS स्मार्ट टिव्हीमध्ये A+ ग्रेडचा पॅनेल आहे. ज्याचे रिजॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. टिव्ही स्क्रीनची साइज 32 इंच आहे. याचबरोबर टिव्हीमध्ये शानदार डिस्प्लेसाठी HRDP टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. शिंकोच्या या स्मार्ट टिव्हीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

(Source)

याशिवाय यामध्ये दोन HDMI पोर्ट्स आणि दोन USB पोर्ट्स देण्यात आले आहेत. यात क्वॉडकोर प्रोसेसर आणि 20 वॉटचा स्पीकर आहे. याचबरोबर यात 3.5एमएम चा जॅक देखील आहे, त्याद्वारे टिव्हीला कोणत्याही साउंडबार अथवा स्पीकरशी कनेक्ट केले जाऊ शकते. या टिव्हीत Hotstar, Zee5, Sony Liv, Voot, Sun NXT, Jio Cinema सारखे अनेक अॅप्स मिळतील.

 

 

Leave a Comment