सचिन बन्सल यांची या बँकेतर वित्तीय संस्थेत 740 कोटींची गुंतवणूक

फ्लिपकार्डचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी एका कंपनीची 94 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. त्यांनी बंगळुरूमधील चैतन्य रूरल इंटरमीडिएशन डेव्हल्पमेंट सर्विसेज (सीआरआयडीएस) मध्ये 740 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. ही एक बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. फ्लिपकार्टचे माजी सीईओ सचिन बन्सल सीआरआयडीएसचे सीईओ म्हणून पदभार स्विकारतील.

सीआरडीएसची स्थापना 2012 मध्ये एनबीएफसी म्हणून झाली होती. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक समस्या सोडवता येतील. ही कंपनी कर्नाटक, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांना कर्ज देते  आणि आर्थिक साक्षरता अभियान चालवते.

सीआरआयडीएसचे सह-संस्थापक समित सेट्टी आणि आनंद राव हे आपल्या पदावर कायम राहतील. बन्सल म्हणाले की, या गुंतवणुकीद्वारे आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. समित आणि आनंद यांनी एक चांगली कंपनी बनवली आहे. ही कंपनी जे लोक औपचारिक रित्या कर्ज घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना कर्ज देते. मी समित आणि आनंद यांच्याबरोबर मिळून काम करण्यास आणि त्यांनी केलेले काम पुढे नेण्यास तत्पर आहे.

काही दिवसांपुर्वीच अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्टला खरेदी केले आहे. दोन्ही कंपन्यांमधील ही डील 16 बिलियन डॉलरची आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर सचिन बन्सल यांनी कंपनीतील सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

Leave a Comment