आता अशिक्षितांना देखील मिळणार व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसेंस

व्यावसायिक वाहन ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारने कमर्शियल लायसेंस बनवण्यासाठी आठवी पर्यंतच्या शिक्षणाची अट रद्द केली आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसेंस नियमामध्ये बदल करत नवीन नियम लागू करण्याची अधिसुचना जारी केली आहे.

अशिक्षित अथवा कमी शिकलेले ड्रायव्हर आता नवीन व्यावसायिक लायसेंस काढू शकतात आणि जुने लायसेंस रिन्यू देखील करू शकतात. सध्या हा नियम दिल्लीतील आरटीओ ऑफिसमध्ये लागू करण्यात आलेला आहे.

अधिसुचनेमध्ये सांगण्यात आले आहे की, या नियमांमध्ये बदल करण्यासाठी लोकांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या. या सुचनांचा विचार करून नियम बदलण्यात आला आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 च्या कलम 8 नुसार ड्रायव्हिंग लायसेंस बनवण्यासाठी आणि रिन्यू करण्यासाठी असलेली 8 वी पर्यंतच्या शिक्षणाची अट रद्द करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अशिक्षित ड्रायव्हरांना फायदा मिळेल व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. शिक्षणाची अट रद्द करण्यात आली असली तरी रस्ते सुरक्षा नियमांचे ड्रायव्हरांना प्रशिक्षण दिले जाईल.

शिक्षणाची अट रद्द केल्याने व्यावसायिक लायसेंस बनवणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment