धनकुबेरांच्या यादीत मुकेश अंबानी सलग ८व्यांदा अव्वल


रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी राहिले आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियाने ही यादी जाहीर केली असून त्यानुसार अंबानी यांची एकूण संपत्ती ३,८०,७०० कोटी इतकी आहे. या यादीत दोन नंबरवर लंडनस्थित हिंदुजा परिवार असून त्यांची संपत्ती १,८६,५०० कोटी रुपये आहे. विप्रोचे माजी अध्यक्ष अजीम प्रेमजी तीन नंबर वर आहेत. त्यांची संपत्ती आहे १,१७,१०० कोटी.

या यादीनुसार यंदा गतवर्षीपेक्षा किमान १ हजार कोटीची मालमत्ता असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली असून ती ८३१ वरून ९५३ वर गेली आहे. मात्र त्याचवेळी अब्जाधीशांची संख्या घटून ती १४१ वरून १३८ वर आली आहे. या यादीतील सर्वाधिक २५ श्रीमंत परीवारांकडे देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के मालमता आहे. या यादीत लक्ष्मी मित्तल चार नंबरवर, गौतम अडाणी ५ नंबरवर आहेत. पुण्याचे सायरस पूनावाला या यादीत सातव्या स्थानी आहेत तर टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री ७६,८०० कोटीच्या संपत्तीसह ८ व्या स्थानावर आहेत.

या यादीतील २४६ श्रीमंत मुंबईवासी आहेत तर १७५ जण दिल्लीवासी आहेत. या यादीत ८२ एनआरआय आहेत. पैकी ३१ जण अमेरिकेत राहणारे आहेत तर ब्रिटन मध्ये राहणारे तीन व युएई मध्ये राहणारे दोघे आहेत. ओयोरुम्सचा संस्थापक सीईओ रितेश अग्रवाल हे सर्वाधिक लहान म्हणजे २५ वर्षाचे असून त्यांची संपत्ती आहे ७५०० कोटी. एचसीएल टेक्नोच्या रोशनी नडार या सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. या ३७ वर्षांच्या आहेत.

Leave a Comment