या अभिनेत्रीवर फिदा आहे जॉन सीना


आपल्या चौकटी बाहेरील भूमिका आणि अभिनयामुळे संपूर्ण जगभरात बॉलिवूडमधील अनेक कलाकार लोकप्रिय आहेत. जगभरातील त्यांचा चाहता वर्ग पाहिला तर खूप मोठा आहे. बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोण यांचा या कलाकारांमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार जॉन सीनामुळे हा समावेश झाला आहे.

आता पर्यंत तब्बल १६ वेळा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पिअनशीपवर जॉन सीनाने स्वत:चे नाव कोरले असल्यामुळे भारतात त्याचे असंख्य चाहते असल्याचे दिसते. असे लाखो चाहते असलेल्या जॉन सीनाला बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आवडत असल्याची कबुली त्याने दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर जॉन सीना केवळ तीन भारतीयांना फॉलो करतो आणि त्यामध्ये आलियाचादेखील समावेश आहे.


जॉन सिन्हा हा व्यावसायिक, गायक, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. सध्या अमेरिकेतील ‘Are You Smarter than a Fifth Grade?’ या शोचे तो सूत्रसंचालन करत आहे. जॉन हा रेसलर देखील आहे. तसेच तो डब्ल्यूडब्ल्यूईमुळे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा एक फोटो काही दिवसांपूर्वी जॉनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. जॉन सीनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सुशांत लष्कराच्या जवानांसोबत उभा असल्याचे दिसत होते. पण कोणतेच कॅप्शन या फोटोला दिले नसल्यामुळे हा फोटो जॉनने नक्की का शेअर केला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Leave a Comment