ऑनलाइन पेमेंट करताना या गोष्टींची घ्या काळजी

तंत्रज्ञानामुळे आयुष्य जेवढे सोपे झाले आहे, तेवढ्याच प्रमाणात अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवनवीन पध्दतीवापरून लोकांना गंडा घातला जात आहे.

ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे आहे व यामुळे वेळेची देखील बचत होत असते. मात्र ऑनलाइन पेमेंट करताना थोडी जरी चूक झाली तर लाखो रूपयांचे नुकसान होऊ शकते.

(Source)

हँकर्स लोकांना फसवण्यासाठी जंक ईमेल, रोबोकॉल, ऑनलाइन रिक्वेस्ट सारख्या गोष्टींचा वापर करतात. सर्वसाधारणपणे लोकांच्या लक्षात येत नाही की, प्रत्येकवेळी येणारी लिंक आणि ईमेलवर क्लिक करण्याची गरज नाही. याचबरोबर प्रत्येक वेळी अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो देखील उचलण्याची गरज नाही. फसवणूक करणारे लोकांना आधी फेक कॉल करतात व त्यांना एनीडेस्क अॅप डाउनलोड करण्यास सांगतात आणि त्यानंतर खाते हॅक करून पैसे गायब करतात.

फेक इ-कॉमर्स साइटद्वारे फसवणूक होणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. अशावेळी जर तुम्ही फेक साइटद्वारे शॉपिंगकरून पेमेंट केले तर तुमच्या कार्डची माहिती चोरीला जाऊ शकते व तुमची फसवणूक होऊ शकते.

(Source)

ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरण्यात येणारे बँक अकाउंट, कार्ड नंबर, सीवीवी नंबर इत्यादी देखील चोरीला जाऊ शकते. जर तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपवर पासवर्ड आणि लॉगइन सेव्ह केले असेल तर, माहिती चोरीला जाण्याची अधिक शक्यता असते. या ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी अधिकृत व विश्वासार्ह्य साइटवरूनच शॉपिंग करावी व कार्डची माहिती द्यावी.

सिम स्वाइपिंगद्वारे देखील मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली जात आहे. हॅकर्स तुमच्या नावाने डुप्लिकेट सिम कार्ड बनवतात. त्यानंतर ऑपरेटर तुमचे ओरिजन सिम बंद करतात. त्यानंतर हॅकर्स फोन नंबरद्वारे वन टाइप पासरव्ड मागून ऑनलाइन ट्रांजेक्शन करतात. यापासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणत्याही नंबरवर मेसेज पाठवू नये, तसेच सिम कार्ड संबंधीत माहिती देऊ नये.

(Source)

अप डाउनलोड केल्यानंतर अनेकदा लोक अप परमिशनकडे दुर्लक्ष करतात. अशावेळेस अप्स तुमच्या फोनमधील फोटो, व्हिडीओ, मेल, मेसेज, कॅमेरा, लोकेशन इत्यादी ट्रॅक करते. त्यामुळे कोणतेही अप डाउनलोड केल्यानंतर त्याची परमिशन सेंटिग व्यवस्थित तपासावी.

 

Leave a Comment