मायकल जॅक्सनचे २५०० एकराचे ‘नेव्हरलँँड रांच’

Michael
सुप्रसिद्ध आणि असामान्य लोकप्रियता लाभलेला अमेरिकन पॉप सिंगर म्हणून मायकल जॅक्सनची ख्याती होती. असा हा अतिशय गुणी गीतकार, संगीतकार आणि गायक आज हयात असता, तर त्याने आपल्या वयाची साठी ओलांडली असती. उत्कृष्ट संगीत, असामान्य नृत्यकलेसाठी लोकप्रिय असलेला मायकल, अनेक समाजकल्याणकारी कार्यांसाठी भरघोस आर्थिक मदत देणारा ‘ह्यूमॅनिटेरियन’ म्हणूनही ओळखला जात असे.
Michael1
काही वर्षांपूर्वी या गायक अचानक हे जग सोडून गेला. तेव्हापासून त्याच्या मृत्युच्या बाबतीत देखील अनेक उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत असतात. अनेकांच्या मतांनुसार मायकलला घातक औषधांचा ओव्हरडोस देऊन जीवे मारले गेले, तर अनेकांच्या मते मायकलने आपल्या मृत्यूचे नाट्य घडवून आणले असून, तो वास्तविक कुठेतरी वेगळ्या नावाने रहात आहे, व योग्य वेळी जगाच्या समोर येण्याची तयारी करीत असल्याचे म्हटले जाते.
Michael5
मायकल जॅक्सनचे राहणीमान अव्वल दर्जाचे असून, २५०० एकरांच्या परिसरामध्ये विस्तारलेले ‘नेव्हरलँड रांच’ येथे त्याचे वास्तव्य होते. आजही या घराची किंमत अब्जावधी डॉलर्स आहे. सध्या हे घर रिकामेच असून मायकलच्या निधनानंतर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची विक्री करणे काहीसे कठीणच होऊन बसले आहे. फ्रेंच नॉर्मंडी धाटणीने ही हे भव्य वास्तूसंकुल उभारले गेले असून, ही रांच कॅलिफोर्नियामधील सँटा बार्बरा काऊंटीमध्ये आहे. ही प्रॉपर्टी मायकलने १९८७ साली खरेदी केली असून त्यानंतर त्याठिकाणी भव्य वास्तू उभारली गेली होती. या भव्य वास्तूमध्ये सहा भले मोठे शयनकक्ष असून, पूल हाउस, तीन गेस्टहाउस, आणि टेनिस कोर्ट आहे. या रांचमध्ये सुमारे चार एकर परिसरामध्ये एक मोठा तलाव असून, या ठिकाणी अनेक झरे देखील तयार करण्यात आले आहेत.
Michael2
नेव्हरलँड हे एका सुप्रसिद्ध कलाकाराचे घर असल्याने या ठिकाणी एक मोठे थियेटर असणेही अगत्याचे होते. म्हणूनच मायकलने या ठिकाणी ५५०० स्वेअर फुट जागेमध्ये एक भव्य थियेटर आणि मोठे स्टेज बनवविले होते. त्याचबरोबर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी भले मोठे थीम पार्कही या ठिकाणी बनवविले गेले होते. २००६ साली या घराची किंमत तब्बल सात अरब रुपये होती. या घराच्या शिवाय मायकलच्या मालकीचे आणखी एक घर असून, त्या घराची किंमत चार अरब रुपये आहे. नेव्हरलँड रांच ही जागा खरेदी करण्यासाठी मायकलने कर्ज घेतले असून, त्याच्या मृत्यूनंतरही या कर्जातील एक अरब रुपये रक्कम शिल्लक होती. त्यानंतर कॉलनी कॅपिटलने ही जागा दीड अरब रुपयांमध्ये खरेदी केली होती. तेव्हापासूनही वास्तू रिकामीच पडून आहे.

Leave a Comment