या लहान राक्षसाला तुम्ही ओळखले का?


वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसोबतच आपल्या मस्तीखोर स्वभावामुळेही बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह अनेकदा चर्चेत असतो. तो चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यस्त असला, तरी आपल्या चाहत्यांसाठी तो आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

View this post on Instagram

😈

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


नुकताच आपल्या लहानपणीचा एक फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला या फोटोत ओळखणेही कठीण जात आहे. या फोटोत राक्षसाप्रमाणे मोठमोठे कृत्रिम दात मस्तीखोर रणवीरने लावले आहेत. तर चेहऱ्यावरही त्याने एखाद्या राक्षसाप्रमाणेच हावभाव आणले आहेत.

रणवीरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत असून त्याचा हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताला मिळालेल्या विश्वचषकावर आधारित या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

Leave a Comment