या बॉसने कर्मचाऱ्यांना दिली ७ लाखाची पगारवाढ


कंपन्या कंपन्यातून वर्षातून एकदा अप्रेझलची चर्चा सुरु होते आणि त्याकाळात कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या अपेक्षांना जणू कोंब फुटू लागतात. अर्थात या अपेक्षा प्रत्यक्षात उतरतील असे नसतेच त्यामुळे कुणासाठी अप्रेझल खुशी तर कुणासाठी गम घेऊन येते. अमेरिकेतील एका कंपनीत दिली गेलेली पगारवाढ ऐकलीत तर मात्र असा बॉस आपल्यालाही मिळावा असेच अनेकांना वाटेल. डॅन प्राईस असे या बॉसचे नाव असून त्याच्या कंपनीचे नाव आहे ग्रॅव्हीटी पेमेंटस. ही कंपनी क्रेडीट कार्ड प्रोसेसिंगच्या व्यवसायात आहे.


३५ वर्षीय डॅन या कंपनीचा सीईओ आहे. यंदाच्या वर्षी त्याने त्याच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना चक्क १० हजार डॉलर्स म्हणजे ७,१०,५०५ रुपये पगारवाढ दिली आहे. त्यामुळे त्याला जगातील बेस्ट बॉस अशी पदवी दिली गेली आहे. या पगारवाढीमुळे या कंपनीतील सर्वाधिक कमी वेतन २८,४२,४८८ रुपये झाले आहे. इतकेच करून डॅन थांबलेला नाही. त्याने येत्या पाच वर्षात त्याच्या कर्मचाऱ्यांना किमान ४९,७४,३५४ रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

Mikey, my dog. He’s pretty cool.

A post shared by Dan Price (@danpriceseattle) on


या कंपनीने नुकतेच चार्ज आयटी प्रो या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. नवीन कार्यालयात कर्मचार्यांनचे स्वागत घोषणा देऊन केले जाते. डॅन सांगतो, कुणाकडे खूप पैसा आणि कुणाकडे मात्र काहीच नाही ही असमानता आहे. मी खूप समस्यात भागीदार बनलो आहे पण आता मला दुसऱ्यांच्या समाधानात भागीदार बनायचे आहे. मी जेव्हा १० लाख डॉलर पगार घेत होतो तेव्हा काही कर्मचारी ३० हजार डॉलर्स पगार घेत होते.


डॅनने ही असमानता कमी करण्यासाठी २०१५ साली त्याचा पगार ९० टक्के कमी केला आणि अन्य बड्या अधिकाऱ्यांचे पगार कमी करून त्यातून उरलेला पैसा कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यासाठी केला आहे. या एका निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आयुष्य खूप बदलले आहे आणि हे समाधान खूप मोठे आहे असे डॅन सांगतो.

Leave a Comment