अ‍ॅमेझॉन लवकरच भारतात लाँच करणार तीन इको डिव्हाईस

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन भारतात नवीन इको स्मार्ट होम स्पीकर लाइनप लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सांगितले की, फेस्टिव सीझनच्या काळात कंपनी तीन नवीन इको डिव्हाईस भारतीय बाजारात लाँच करेल. या नवीन इको डिव्हाईसला अ‍ॅमेझॉनवरून बुक केले जाऊ शकते. कंपनी हे प्रोडक्ट 16 ऑक्टोंबरला रिलीज करेल व याची शिपिंग पुढील वर्षीपासून सुरू होईल.

(Source)

ऑल न्यू इको –

ऑल न्यू इकोमध्ये फेब्रिक डिझाईन आणि प्रिमियम साउंड मिळेल. याची किंमत 9,999 रूपये आहे. हे डिव्हाईस चारकोल, ग्रे, सँडस्टोन आणि ट्विलाइट ब्लू रंगामध्ये उपलब्ध आहे.

(Source)

इको डॉट –

इको डॉटमध्ये घड्याळ देखील मिळेल. यामध्ये ब्राइट एलईडी डिस्प्ले असेल, जे तापमान, टायमर आणि अलार्म यासारख्या सुविधा देखील देईल. या डिव्हाईसची किंमत 5,499 रूपये आहे.

(Source)

इको स्टूडियो – 

इको स्टूडियोमध्ये फाइव डायरेक्शन स्पीकर मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की, यामध्ये स्टुडिओ क्वॉलिटी साउंड, रूम एडॉप्शन टेक्नोलॉजी आणि बिल्ट-इन स्मार्ट होम हब सारखे फिचर्स असतील. या डिव्हाईसची किंमत 22,999 रूपये आहे.

(Source)

हे तिन्ही डिव्हाईस प्री बुकिंगसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. तसेच, काही ठरावीक स्टोर्समधून देखील हे डिव्हाईस बुक केले जाऊ शकतात. यांची शिपिंग पुढील वर्षी सुरू होईल. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 199 रूपयांचा स्मार्ट बल्ब मोफत मिळेल.

Leave a Comment