भारता व्यतिरिक्त या देशांमध्ये स्वस्तात विकला जात आहे आयफोन 11

काही दिवसापुर्वीच अपल कंपनीने आयफोन 11 सीरिज लाँच केली असून, फोनची प्री बुकिंग सुरू झाली आहे. भारतातही आयफोनला मोठ्या प्रमाणात पंसत केले जाते. मात्र असे 12 देश आहेत, जेथे आयफोनची किंमत ही भारतापेक्षा ही कमी आहे. भारतामध्ये आयफोन 11 (64 जीबी ) ची किंमत 64,900 रूपये आहे.

(Source)

सिंगापूरमध्ये अ‍ॅपल आयफोन 11(64 जीबी) ची किंमत 1,149 सिंगापूर डॉलर (59,300 रूपये) आहे.

अमेरिकेत विविध राज्यात वेगवेगळी करप्रणाली आहे. आयफोन 11 (64 जीबी) व्हेरिएंटची किंमत 699 डॉलर ते 761.91 डॉलर पर्यंत आहे. हॅम्पशायरमधून आयफोन खरेदी केल्यास 699 डॉलर (49,700 रूपये) ला मिळेल. तर सॅन जॉसमधून खरेदी केल्यास हे व्हेरिएंट तुम्हाला 761.91 डॉलर (54,200 रूपये) ला मिळेल. याचाच अर्थ जर तुम्ही अमेरिकेतून आयफोन खरेदी केल्यास 10,700 ते 15,200 रूपयांची बचत होऊ शकते.

(Source)

कॅनेडामध्ये देखील अमेरिकेप्रमाणेच राज्यनिहाय वेगवेगळी करप्रणाली आहे. कॅनेडामध्ये तुम्हाला आयफोन 11 (64 जीबी) 1,126 कॅनेडियन डॉलर (60,300 रूपये) ला मिळेल.

जापानमध्ये आयफोन 11 (64 जीबी) ची विक्री 80,784 येन (53,400 रूपये) मध्ये केली जात आहे.

(Source)

हाँगकाँगमध्ये आयफोन 11 (64 जीबी) ची विक्री 5,999 हाँगकाँग डॉलर्स (54,400 रूपये) मध्ये केली जात आहे.

जर तुम्ही दुबई आणि युएईमध्ये आयफोन खरेदी करण्यचा विचार करत असाल तर तेथे आयफोन 11 (64 जीबी) तुम्हाला 2,949 दिरहम (57,100 रूपये) मध्ये मिळेल.

(Source)

ऑस्ट्रेलियामध्ये आयफोन 11 (64 जीबी) ची किंमत 1,199 ऑस्ट्रेलियन डॉलर (57,500 रूपये) एवढी आहे.

चीनमध्ये आयफोन 11 (64 जीबी) ची विक्री 5,499 युआन (54,820 रूपये) ला केली जात आहे.

(Source)

आयफोन 11 (64 जीबी) ची मलेशियामध्ये किंमत 3,399 मलेशिया रिंगिंट (57,650 रूपये) आहे. तर फ्रांसमध्ये तुम्ही आयफोन 11 (64 जीबी) 809 युरो (63,150 रूपये) मध्ये खरेदी करू शकता.

(Source)

आयफोन 11 (64 जीबी) ची न्युझीलंडमध्ये किंमत 1,349 न्यूझीलंड डॉलर (60250 रूपये) आहे.

(Source)

जर्मनीमध्ये आयफोन 11 (64 जीबी) ची किंमत 799 युरो (62,400 रूपये) आहे. भारतात आयफोन 11 ची किंमत 64,900 रूपयांपासून सुरू होते.

Leave a Comment