आणखी एका हॉट वेब सीरिजमध्ये झळकणार बेबी डॉल


पॉर्नपटांना राम राम ठोकत बॉलीवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण करणारी बेबी डॉल अर्थात सनी लिओन लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कामसुत्रावर आधारित ही वेब सीरिज असल्याचे म्हटले जात आहे.

छोट्या पडद्यावरील क्विन एकता कपूर या वेब सीरिजची निर्मिती करणार आहे. एकता आणि सनीमध्ये कामसूत्रावर आधारित वेब सीरिजच्या निर्मितीबाबत चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. एकता आणि सनी ही जोडी ‘रागिनी एमएमएस २’ चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहे. कामसुत्रावर आधारित वेब सीरिजची स्क्रीप्ट सनीने वाचली असून या भूमिकेसाठी तिने होकार कळवला आहे. राजस्थानमधील गोली समाजातील एका महिलेची भूमिका सनी या वेब सीरिजमध्ये साकारणार आहे. आता चाहत्यांमध्ये या वेब सीरिजची उत्सुकता वाढली आहे.

कामसूत्रावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमध्ये यापूर्वी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये मिरा नायरचा ‘कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटाचा समावेश आहे. त्यावेळी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. पण चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यावर भारतात बंदी घालण्यात आली होती.

Leave a Comment