या अजब विमानतळाचे शी जिनपिंग यांच्या हस्ते उद्घाटन


चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बुधवारी बीजिंग येथील एका नवीन विमानतळाचे उद्घाटन केले. हे भविष्यातील विमानतळ असल्याचे सांगितले जात असून, स्टारफिशच्या आकाराचे हे विमानतळ जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ असेल, असे सांगितले जात आहे. कम्यूनिस्ट शासनाला 70 वर्ष झाल्याच्या निमित्ताने शी जिनपिंग यांनी या स्टारफिश विमानतळाचे उद्घाटन केले.

तियनमेन स्केअ पासून हे विमानतळ 46 किलोमीटर अंतरावर आहे. 2040 पर्यंत बिजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ पुर्ण क्षमतेने कार्य करेल. यात 8 रन वे असतील. तसेच वर्षाला 100 मिलियन प्रवाशी येथून ये-जा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(Source)

देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही एअरलाईन्सने या नवीन विमानतळावर कार्य करण्यास सुरूवात करणार असल्याची योजना बनवली आहे. ब्रिटिश एअरवेज्, कॅथी पॅसिफिक आणि फिन्नेर यांनी आधीच डॅक्सी विमानतळावरील आपला रूट जाहीर केला आहे. इतर एअरलाईन्स देखील लवकरच या विमानतळावरून उड्डाण घेतील.

(Source)

हे विमानतळ 700,000 स्केअर मीटर (137 एकर) एवढे मोठे असून, या जागेत100 फुटबॉल मैदाने सहज सामावू शकतील. हे जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट टर्मिनल्स आहे. या बिल्डिंगची निर्मिती इराकी-ब्रिटिश आर्किटेक्ट झहा हादिदने केली आहे. त्याचा 2016 साली मृत्यू झाला.

या टर्मिनलच्या खाली प्रवाशांसाठी सीटी सेंटरला पोहचण्यासाठी ट्रेन आणि मेट्रो स्टेशन देखील आहे. या प्रोजेक्टचा खर्च 120 बिलियन युआन (17.5 बिलियन डॉलर) एवढा आहे. इतर रेल्वे आणि रोड विमानतळाला जोडण्याचा खर्च 400 बिलियन युआन एवढा आहे.

Leave a Comment