केरळच्या या गावात बनत आहे पीव्ही सिंधूचा पुतळा


भारताची बॅडमिंटन स्टार आणि जागतिक बॅडमिंटन चँपियन पीव्ही सिंधू या आठवड्यात केरळच्या एका शांत सुंदर गावात शतकानुशतके सुरु असलेल्या जुन्या लोककलेचा एक भाग बनणार आहे. विशेष म्हणजे यात सिंधू प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाही तर तिचा नैसर्गिक वस्तू वापरून केला जाणारा ६ फुटी पुतळा या कार्यक्रमाचा भाग असेल.

केरळच्या नीलमपेरूर पदथानी येथे दरवर्षी पल्ली भगवती मंदिरात १६ दिवस प्रसिद्ध वार्षिक लोककला कार्यक्रम साजरा होतो. यात अनेक पुतळे बनविले जातात. तशी परंपरा आहे. २७ सप्टेंबर रोजी होत असलेल्या कार्यक्रमात सिंधूचा हातात बॅडमिंटन रॅकेट घेतलेला प्रतीकात्मक कोलाम म्हणजे पुतळा असेल.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार वनदुर्गेला हे मंदिर समर्पित असून कोट्टायम अल्प्पुझा सीमेवर नीलमपेरूर येथे हे मंदिर आहे. हे मंदिर १७०० वर्षे जुने असून दैवी, अर्धदैवी व्यक्तीशिवाय गावातील कलाकार पुतळे बनवितात. महिला सशक्तीकरण व सिंधूने नुकतेच मिळविलेले जागतिक अजिंक्यपद यामुळे सिंधूचा पुतळा तयार होत असून सुपारीचे हिर, केळी, बांबू आणि कमळे याचा वापर हा पुतळा बनविण्यासाठी केला जात आहे.

Leave a Comment