मारूती सुझुकीच्या या 10 गाड्यांवर हजारो रूपयांची सूट

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारूती सुझुकीने आपल्या 10 कारच्या किंमती 5 हजार रूपयांपर्यंत कमी केल्या आहेत. कंपनीने ज्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत, त्यामध्ये ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सेलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेजा आणि एस क्रॉसच्या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. कंपनीचे डिस्काउंट फेस्टिव सिझनच्या अन्य ऑफर्सपेक्षा वेगळी आहे. म्हणजेचे ग्राहकांना मारूती सुझुकीचे फेस्टिव सिझनचे ऑफर्स देखील मिळतील.

(Source)

मारूती सुझुकीकडून सांगण्यात आले आहे की, कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एंट्री लेव्हलच्या ग्राहकांना कार खरेदी करणे सोपे होईल. कंपनीला आशा आहे की, यामुळे कार्सच्या विक्रीमध्ये वाढ होईल.

(Source)

काही दिवसांपुर्वीच अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 22 टक्के इतका इन्कम टॅक्स या कंपन्यांना भरावा लागणार आहे, असे म्हटले आहे. तसेच, सरचार्ज आणि सेस जोडल्यानंतर हा टॅक्स 25.17 टक्के असेल. याचा फायदा 30 टक्के कॉर्पोरेट टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या मोठ्या कंपन्यांना होईल.

मारूती सुझुकीच्या कारची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे कंपनीला प्रोडक्शन देखील कमी करावे लागले . त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून नवनवीन ऑफर्स देण्यात येत आहे.

Leave a Comment