पुरात अडकलेल्या लोकांसाठी हा कर्मचारी एकटा करत होता 36 तास काम

अमेरिकेतील टेक्सासमधील एक हॉटेल कर्मचारी एकटा रात्रभर पुरामुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना गरजेच्या वस्तू पुरवत होता. या हॉटेल कर्मचाऱ्याचे नाव सॅचल स्मिथ आहे. त्याने 36 तास न थांबता लोकांना मदत केली. तो म्हणाला की, मला कळालेच नाही की, मी एवढा वेळ काम करत होतो. मला चांगले वाटले की, मी अशावेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

टेक्सासमध्ये पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी साचल्याने हजारो लोक पुरात अडकले आहेत. हॉटेल होमवुडमध्ये 90 लोक अडकली होती. यावेळी सॅचल एकटाच हॉटेलमध्ये कर्मचारी होता. यावेळी सॅचलने हॉटेलमध्ये अडकलेल्या सर्व लोकांना कॉफी देण्यापासून ते त्यांच्या फोनला उत्तर देण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. दुसऱ्या सकाळी त्याने सर्वांना नाश्ता देखील दिला. त्याने 36 तास मॅनेजरेचे काम देखील केले. याचबरोबर फ्रंट डेस्क, मेंटिनेस आणि किचेनची जबाबदारी देखील सांभाळत होता.

Meet Satchel. He is the only employee here at Homewood Suites in Beaumont. The access road is underwater and I10 is shut…

Posted by Angela K Chandler on Thursday, September 19, 2019

त्याला एकट्याला काम करताना बघून हॉटेलमध्ये थांबलेले ग्राहक देखील मदत करू लागले. कोणी जेवण देण्यासाठी त्याला मदत केली, तर कोणी प्लेट्स साफ केल्या. स्मिथने सांगितले की, तो चांगला कूक नाही. तरी देखील लोकांनी त्याच्याद्वारे बनवण्यात आलेले जेवण आवडीने खाल्ले.

स्मिथ म्हणाला की, मी गेस्टचा आभारी आहे की, त्यांनी मला मदत केली. तर गेस्ट म्हणाले की, स्मिथ आमचा हिरो आहे. तो 36 तास त्यांच्यासाठी काम करत होता. हॉटेलमधील स्वच्छ पाणी संपल्यानंतर त्याने लांब पाण्यात अडकलेल्या टॅक्टरमधून पाणी देखील आणले. हॉटेलमध्ये असलेल्या एका गेस्टने ही पुर्ण माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे व स्मिथचे आभार मानले.

Leave a Comment