ईडीने अजित पवारांसह अन्य नेत्यांवर केलेली कारवाई कायदेशीरच – माधव भंडारी


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात केलेली कारवाई ही कायदेशीरच असल्याचा दावा भाजपने केला आहे. अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडी ही स्वायत्त संस्था असून पोलीसात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह अन्य 70 नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. भंडारी यांनी या आरोपाला उत्तर दिले आहे. ईडी सारख्या स्वायत्त संस्थेवर आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. एखाद्या संस्थेत अथवा बँकेत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असेल. त्या घोटाळ्या संदर्भात प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला असेल तर ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार संविधानाने दिला आहे. यात काहीही राजकीय दबाव असण्याचे कारण नाही, असे भांडारी यांनी म्हटले आहे. नियमबाह्य पद्धतीने सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा पैसा खिरापत म्हणून वाटण्यात आला आले तर त्याची चौकशी ही झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

Leave a Comment