ट्रम्प यांनी एल्विस प्रेस्लीशी केली पंतप्रधान मोदींची तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. दोन्ही नेते प्रत्येक कार्यक्रमात एकमेकांची जोरदार प्रशंसा करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दरम्यान पंतप्रधान मोदी यांची तुलना प्रसिध्द अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीशी केली.

ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदी मला आवडतात. ते फादर ऑफ इंडिया आहेत. पंतप्रधान मोदी हे एल्विस प्रेस्ली प्रमाणेच लोकप्रिय आहेत. यानंतर नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे केवळ माझेच नाही तर भारताचेही चांगले मित्र आहेत. भारत आणि अमेरिकेची मैत्री अधिक घट्ट होईल. याचबरोबर दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि दहशतवाद या मुद्यांवर देखील चर्चा केली.

एल्विस प्रेस्लीबद्दल सांगायचे तर ते एक प्रसिध्द रॉक स्टार गायक होते. त्यांची लोकप्रियता जगभरात पसरलेली होती. बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर यांना हिंदी चित्रपटातील एल्विस प्रेस्ली म्हटले जाते. शम्मी कपूर यांची स्टाइल एल्विस प्रेस्लीशी खूप जुळते. याशिवाय 1968 मध्ये आलेला राजेंद्र कुमार यांचा चित्रपट ‘झुक गया आसमान’मधील प्रसिध्द ‘गाणे कौन है जो सपनों में आया’, याचे म्युझिक एल्विसचे प्रसिध्द गाणे ‘हू मेक्स माय हार्टबीट लाइक थंडर’ चे कॉपी होते. हे हिंदी गाणे मोहम्मद रफी यांनी गायले होते. त्यांना ‘किंग ऑफ रॉक अँन्ड रोल’ आणि ‘द किंग’ म्हणूनही ओळखले जात असे.  42 व्या वर्षी 16 ऑगस्ट 1977 ला एल्विस प्रेस्ली यांचे निधन झाले.

Leave a Comment