भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या बीएमडब्ल्यूच्या दोन शानदार बाईक्स


बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात BMW R 1250 R आणि BMW R 1250 RT या दोन बाईक्स लाँच केल्या आहेत. BMW R 1250 R ची किंमत 15.95 लाख रूपये तर BMW R 1250 RT ची किंमत 22.5 लाख रूपये आहे.


नवीन बीएमडब्ल्यू आर 1250 आर ब्लॅक स्टॉर्म मेटालिक रंगामध्ये उपलब्ध आहे. तर आर 1250 आरटी  ब्लूप्लेनेट मेटालिक आणि 719 स्पार्कलिंग स्टॉर्म मेटालिक रंगामध्ये उपलब्ध आहे.


दोन्ही मॉडेल्समध्ये कंपनीने 2 सिलेंडर इन-लाइन बॉक्सर इंजिन दिले आहेत, जे 1254cc चे आहेत. हे इंजिन 7,750 rpm वर 136 bhp ची पॉवर आणि 6,250 rpm वर 143 Nm टॉर्क जनरेट करते.  याचबरोबर व्हेरिएबल कॅमशॉफ्ट कंट्रोल देण्यात आला आहे, जी नवीन टेक्नोलॉजी आहे. ज्यामुळे इंजनला अतिरिक्त पॉवर मिळते.


बीएमडब्ल्यू आर 1250 आर आणि बीएमडब्ल्यू आर 1250 आरटी दोन रायडिंग मोड्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यात स्टँडर्ड ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल (ASC) दिला आहे, जे रायडिंग सेफ्टीसाठी हाय लेव्हल आहे. याचबरोबर कंपनीने दोन्हीमध्ये एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि हिल स्टार्ट कंट्रोल दिला आहे.


बीएमडब्ल्यू आर 1250 आरटी मध्ये कंपनीने सीट हीटिंग, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, टायर प्रेशर कंट्रोल आणि एंटी-थेफ्ट अलर्ट सिस्टम सारखे फिचर्स दिले आहेत. याशिवाय डायनामिक ईएसए, जीपीएस यूनिट, क्रूज कंट्रोल आमि किलेस राइड देखील दिले आहे.


बीएमडब्ल्यू आर 1250 आर मध्ये कनेक्टिविटी फिचरसाठी 6.5 इंचची फुल-कलर टीएफटी स्क्रीन दिली आहे. जी बीएमडब्ल्यू मोटोर्राड मल्टी-कंट्रोलरद्वारे ऑपरेट करता येते. यामध्ये एका अपद्वारे फोन आणि मीडिया फंक्शन्सचा वापर करता येतो. बीएमडब्ल्यू आर 1250 आरटीमध्ये 5.7 इंचची टीएफटी कलर स्क्रीन देण्यात आली आहे.

 

Leave a Comment