थायलंडमध्ये भरणार चक्क पक्ष्यांची गायन स्पर्धा


थायलंडमधील दक्षिण प्रांतातील नारथीवॉटमध्ये बर्ड सिंगिंग कॉम्पिटिशन सुरू झाले आहे. या स्पर्धेत थालंड, मलेशिया आणि सिंगापूरमधील 1800 पक्ष्यांनी भाग घेतला आहे. स्पर्धेत पक्ष्यांना एका पिंजऱ्यात बसवून 15 फूट उंचावरील खांबावर लटकवले जाते. त्यानंतर त्यांना क्रमानुसार गाण्यास सांगितले जाते. या स्पर्धेत पोपट, कबूतर, बुलबूल आणि अन्य छोटे पक्षी सहभागी होतात.

(Source)

पक्ष्यांचे मालक चार महिन्यांपुर्वीच या स्पर्धेची तयारी सुरू करतात. स्पर्धेत चार फेऱ्या असतात. पक्ष्यांना एका फेरीत जिंकण्यासाठी कमीत कमी 3 वेळा गाणे गरजेचे असते. गाण्याचा कालावधी 25 सेंकद असतो. पक्ष्यांना ठेवण्यात येणारे पिंजरे सजवले जातात, त्यात पक्ष्यांसाठी खाण्या-पिण्याची वस्तू देखील ठेवतात.

(Source)

आयोजकांनी सांगितले की, स्पर्धेदरम्यान परिक्षक क्रमानुसार एका-एका पक्ष्याचे गाणे ऐकतात. पक्ष्यांना त्यांचे गाणे आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर गुण दिले जातात. सर्वाधिक गुण मिळणाऱ्या पक्ष्यांला विजेते घोषित केले जाते. मागील वर्षी विजेत्याला 70 हजार रूपये बक्षीस मिळाले होते, तर यंदा विजेत्याला ट्रॉफी आणि 1.5 लाख रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

Leave a Comment