रणवीरला फॅशनमध्ये खुन्नस देणारा बिली पोर्टर


बॉलीवूड मध्ये रणवीरसिंग त्याच्या अजब फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची या बाबतीतली एनर्जी आणि खास प्रसिद्धी पहिली की रणवीर काहीही कपडे घालू शकेल याची भल्याभल्याना खात्री पटतेच. अमेरिकन अभिनेता बिली पोर्टर या संदर्भात रणवीरचा भाऊ शोभेल पण रणवीरपेक्षा तो दोन पावले पुढेच आहे. बिलीची फॅशन म्हणजे आणखीनच धमाल याची प्रचीती नुकत्याच पार पडलेल्या ७१ व्या प्राईम टाईम अॅमी अॅवॉर्ड दरम्यान आली. बिलीला ‘पोज’ मधील भूमिकेबद्दल बेस्ट अॅक्टर इन ड्रामा अॅवॉर्ड मिळाले. विशेष म्हणजे हे अॅवॉर्ड जिंकणारा तो पहिला समलैंगिक आणि अश्वेत कलाकार आहे.

सोमवारी बिली या कार्यक्रमात अॅवॉर्ड स्विकारण्यासाठी आला तेव्हा त्याने जो सुट घातला होता तो पाहून उपस्थितांचे डोळे अक्षरशः दिपले. हा सुट हिरे आणि लाखो क्रिस्टल्सनी सजविला गेला होता. एका रिपोर्ट नुसार या सुटवर ५१,०७,३९२ रुपये किमतीचे हिरे जडविले गेले होते आणि १,३०,००० क्रिस्टल्सनी तो सजविला गेला होता. हा सुट तयार करण्यासाठी १७० तास लागले होते. हॉलीवूड रिपोर्टर नुसार हा सुट लग्झरी ब्रांड मायकल कॉर्स यांनी तयार केला होता आणि त्यानीच बिलीची भेट घेऊन अॅमी अॅवॉर्डसाठी हा सुट घालावा म्हणून करार केला होता.

या ब्रांडचे प्रमुख म्हणाले आम्हाला ७० च्या दशकातील डिस्को लुक दाखवायचा होता. बिलीच्या फॅशन सेन्सची झलक इन्स्टाग्रामवर दिसतेच. तो नेहमीच विविध कपड्यांवर प्रयोग करतो. या सुट साठी विशेष हॅट बनविली गेली होती तसेच बिलीने हायहिल्स घातले होते आणि त्याच्या नखांवरही क्रिस्टल्स लावले गेले होते.

Leave a Comment