भारतीय सैन्याने हटवला ग्लेशिअरमधील 130 टन कचरा

भारतीय सैन्याने जगातील सर्वाधिक खतरनाक युध्दस्थळाच्या परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी चालवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत सियाचीन ग्लेशिअरमधून 130 टन कचरा हटवला आहे. मोठ्या संख्येत सैनिकांच्या उपस्थितीमुळे ग्लेशियरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 130.18 टन कचरा हटवण्यात आला आहे. यामध्ये 48 टनापेक्षा अधिक बायोडिग्रेडेबल कचरा, 40.32 टन नॉन मेटेलिक कचरा आणि 41.45 टन नॉन बायोडिग्रेडेबल मेटेलिक कचरा काढण्यात आला आहे. आकड्यांनुसार ग्लेशिअरवर एकूण 236 टन कचरा जमा झाला होता.

(Source)

सैन्याने यासाठी कार्डबोर्ड रिसायलिंग मशीन देखील बसवली आहे. याचबरोबर सैन्याने लेह आणि आजुबाजूच्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृकता पसरवण्यासाठी अभियान देखील चालवले आहे.

(Source)

सियाचीन ग्लेशिअरवरील 12000 फुट उंचावरील काराकोर्म रेंज हे जगातील सर्वाधिक उंचावरील सैनिकी क्षेत्र आहे. येथे सैनिकांना थंडी आणि वादळांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात ग्लेशिअर जवळील तापमान हे मायन्स 60 डिग्री सेल्सियसपर्यंत देखील पोहचते.

 

Leave a Comment