ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी


तीन ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा जागतिक चँपियनशिप मिळविलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू स्टेफनी राईस हिने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भारतात जलतरण अकादमी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात भारतीय जलतरणपटूना पदक जिंकण्यासाठी या अकादमीची मदत होईल असे तिचे म्हणणे आहे.

स्टेफनी म्हणाली भारतात अनेक गुणवान जलतरणपटू आहेत. मात्र ऑलिम्पिक मेडल्स मिळविण्यासाठी जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण दिले जाणे अपेक्षित असते. त्यामुळे तिने ही अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येथे उच्च पातळीचे प्रशिक्षक माझ्या टीमसोबत असतील. त्याचा भारतीय जलतरणपटूंना चांगला उपयोग होईल. आम्ही एक चांगली टीम तयार करू असा विश्वास आहे. यासाठी १३ वर्षांवरील गुणवान जलतरणपटू येथे यावेत म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. या जलतरणपटूनी पूर्वी प्रशिक्षण घेतलेले असावे अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment