१०० रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात बसला 77 हजार रूपयांचा फटका


बिहारची राजधानी पाटणामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीला झोमॅटोवरून जेवण मागवणे चांगलेच महागात पडले आहे. पाटणा येथील एका इंजिनिअरने झोमॅटोवरून 100 रूपयांचे जेवण मागवले. मात्र जेवणाची क्वॉलिट त्याला आवडली नसल्याने त्याने 100 रूपये पुन्हा मागितले. मात्र 100 रूपये तर त्याला परत भेटले नाहीच, त्यालाच 77 हजार रूपयांना फटका बसला.

पाटणामधील विष्णू नावाच्या इंजिनिअरने झॉमेटोवरून जेवण मागवले. डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आल्यावर, जेवणाची क्वॉलिटी चांगली नाही म्हणून ऑर्डर परत घेऊन जाण्यास सांगितली. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने त्याला झोमॅटो कस्टमर केअरला कॉल करण्यास सांगितले. विष्णूने गुगल सर्च करत जो पहिला कस्टमर केअर नंबर दिसेल त्यावर कॉल केला आणि समोरून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन केले.

विष्णूबरोबर फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने त्याला झोमॅटो कस्टमर केअर एग्झिक्यूटिव बोलतोय असे सांगितले.  त्याने सांगितले की, 100 रूपयांच्या रिफंडसाठी त्याच्या खात्यातून 10 रूपये कापले जातील. त्यानंतर त्या व्यक्तीने विष्णूला 10 रूपये जमा करण्यासाठी एक लिंक पाठवली. कोणताही विचार न करता विष्णूने देखील लिंक ऑपन करत 10 रूपये जमा केले.

या संपुर्ण प्रक्रियेनंतर काही मिनिटातच विष्णूच्या खात्यातून ट्रांजेक्शनद्वारे 77 हजार रूपये गायब आले. पोलिस आणि बँकांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.

Leave a Comment