तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरावाला या कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन लाँच


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने Mi Mix Alpha हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात आले असून, हा एकदम हटके फोन आहे. यामध्ये Waterfall Display देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये पुर्ण कर्व्ड ऐजस देण्यात आले आहेत. डिस्प्लेचे कर्व्ड एवढे खालच्या बाजूला आहेत की, त्यामुळे मागच्या बाजूला देखील तुम्हाला डिस्प्ले दिसेल.

असे वाटते की, हा फोन पुर्ण स्क्रीनपासूनच बनवण्यात आलेला आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा नसून, सेल्फी काढण्यासाठी फोन उलटा करावा लागेल. रिअर कॅमेराच सेल्फी कॅमेऱ्याचे काम करेल. डिस्प्लेच्या मागील बाजूला देखील तुम्ही स्वतःचा पाहू शकता.

(Source)

या फोनमध्ये सराउंडिग डिस्प्ले असून, स्क्रीन टू-बॉडी रेश्यो 180.6 टक्के आहे. बाजारात ड्युल डिस्प्ले असणारे फोन देखील आहेत, मात्र हा फोन वेगळा आहे.

या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात 108 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आहे. हा सॅमसंगचा सेंसर कॅमेरा असून, दोन्ही कंपन्यांनी मिळून बनवला आहे. अंधारात देखील चांगला फोटा यावा यासाठी याला खास डिझाईन करण्यात आले आहे. 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याबरोबर 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 20 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

(Source)

यामध्ये Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 5 जी कनेक्टिवीट सपोर्ट स्मार्टफोन आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच, 4,050mAh च्या बॅटरीबरोबर  40W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.

(Source)

कंपनीने हा कॉन्सेप्ट स्मार्टफोन आहे असे सांगितले आहे. लोकांसाठी हा स्मार्टफोन कधी लाँच करणार हे कंपनीने अद्याप सांगितले नाही. लाँच दरम्यान कंपनीचे सीईओ लेई जुन यांच्याजवळ हा स्मार्टफोन होता. सुरूवातीला कमी युनिट्समध्ये हा फोन बाजारात येणार आहे. याची किंमत 19999 युआन (1.98 लाख रुपये) असेल.

 

Leave a Comment