सुरतमध्ये भरलेल्या त्या विचित्र स्पर्धेत कुणी मारली बाजी…?


सुरतमध्ये नुकतीच आपल्या देशातील पहिलीच ‘ भव्य पाद स्पर्धा’ संपन्न झाली. ‘व्हॉट द फार्ट’ असे नाव असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यात स्पर्धकांना लाज आडवी आल्यामुळे या स्पर्धेत केवळ तीनच स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

ही स्पर्धा सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेचे परिक्षण कविता परमार, आरजे देवानंग रावल आणि डॉ. प्रणव पाचिगर यांनी केले. तर या स्पर्धेसाठी मुंबई, जयपूर आणि दुबईसारख्या शहरांमधील २०० पुरुष आणि स्त्रियांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या स्पर्धेसाठी त्यापैकी फक्त तीनच स्पर्धकांनी हजेरी लावली होती. या स्पर्धकांपैकी एक स्पर्धका हा सुरतचाच रहिवासी होता.

दरम्यान, स्पर्धेत केवळ तीनच स्पर्धक सहभागी झाले. पण स्पर्धकांपैकी कुणालाही नंबर मिळवता न आल्यामुळे आयोजकांनी सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. २५०० रुपये रोख व एक गिफ्ट असे बक्षिसाचे स्वरूप होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. पण त्यांनी लाजाळूपणामुळे स्पर्धेत सहभाग नोंदवला नाही. या कार्यक्रमासाठी बर्‍याच महिलांनी देखील नोंदणी केली होती. पण नंतर त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.

गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. पादण्याच्या स्पर्धा चीन, अमेरिका या देशांमध्ये होत असल्यामुळे त्यांनी ही स्पर्धा भारतातही आयोजित करण्याचे ठरवले होते.

Leave a Comment