सोशल मीडियाला मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार?, न्यायालयाचा सरकारला सवाल


सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सोशल मीडियाचा दुरूपयोग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे कधी लागू होणार ? असा प्रश्न विचारला आहे. याचबरोबर  मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे देखील न्यायालयाने सांगण्यास सांगितले आहे.

न्यायालयाने म्हटले की, सोशल मीडिया संदेश, माहिती आणि इतर कॉन्टेंट उपलब्ध करणाऱ्याचा शोध घेणे अवघड आहे, हा गंभीर मुद्दा आहे. यासाठी योग्य मार्गदर्शक तत्वांची गरज आहे.

न्यायालयाने सोशल मीडियाच्या दुरूपयोगावर चिंता व्यक्त करत म्हटले की, सोशल मीडियाचा दुरूपयोग हा धोकादायक आहे. सरकारने हा दुरूपयोग रोखण्यासाठी लवकराच लवकर पाऊल उचलले पाहिजे.

सोशल मीडियाचा दुरूपयोग हा धोकादायक झाला असून, सरकारने यात लक्ष्य घालणे गरजेचे आहे. उच्च न्यायालय या मुद्यावर निर्णय देण्यास सक्षम नाही, सरकारच यासाठी मार्गदर्शक तत्वे आणू शकते.

 

Leave a Comment