सोनाक्षी ही ‘धन पशू’ आहे – उत्तर प्रदेशमधील मंत्र्याची टीका


सोशल मीडियावर गेल्याच आठवड्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. सोनाक्षीला या शोमध्ये रामायणावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नसल्यामुळे या प्रश्नासाठी तिने ‘लाईफ लाईन’ वापरली. खेळातील अनेक सोप्या प्रश्नाची उत्तरे माहित नसलेल्या सोनाक्षीला नंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि श्रम कल्याण परिषदचे अध्यक्ष सुनील भराला यांनीही यावरून सोनाक्षीवर टीका केली आहे. सोनाक्षी ही ‘धन पशू’ असून असे लोक आजच्या काळात केवळ पैशांचा विचार करतात. ते फक्त पैसे कमावतात आणि स्वत:वर खर्च करतात. इतिहास आणि देवाबद्दल ते अज्ञानी असतात. शिकण्याकरता त्यांच्याजवळ वेळच नसतो, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असून शकत नसल्याची टीका त्यांनी सोनाक्षीवर केली आहे.


दरम्यान सोनाक्षीला केबीसीमध्ये रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी आणली होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तिला यासाठी सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम असे चार पर्याय देण्यात आले होते. पण या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नसल्यामुळे तिने लाइफ लाइनचा वापर केला होता.

Leave a Comment