शेन वॉर्न पुन्हा अडचणीत


ऑस्ट्रेलियाचा माजी बोलर आणि उपकप्तान शेन वॉर्न पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला असून यावेळी न्यायालयाने त्याला वेग मर्यादा उल्लंघन प्रकरणात १ वर्षे ड्रायविंग बंदी आणि ३ हजार डॉलर्स म्हणजे साधारण सव्वा दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

शेन वॉर्न आणि वादविवाद यांचे घट्ट नाते आहे. या महिन्यात त्याच्यावर अडचणीत सापडण्याची ही दुसरी वेळ आली आहे. या महिन्याच्या सुरवातीलाच लंडन येथील त्याच्या घरात कॉलगर्ल सह पार्टी करताना तो पकडला गेला होता आणि त्यावेळी मिडिया फोटोग्राफर तेथे पोहोचताच अनवाणी पायांनी कारमधून पळून जाण्याची पाळी त्याच्यावर आली होती. शेन वॉर्न त्याची एक गर्लफ्रेंड आणि दोन कॉल गर्ल याच्यासह त्याच्या घरात रात्री उशिरा पार्टी करत होता आणि त्यावेळी जोरजोराने म्युझिक सुरु होते म्हणून शेजाऱ्यांनी मिडिया फोटोग्राफरला फोन करून या घटनेची माहिती दिली होती.

यावेळी शेन वॉर्न याने वाहनाची वेग मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालविले आणि हा गुन्हा त्याने दोन वर्षात सहा वेळा केल्याने जिल्हा न्यायाधीश अद्रियन टर्नर यांनी त्याला गाडी चालविण्यावर १२ महिने बंदी आणि ३ हजार डॉलर्स दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शेन वॉर्नने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.

सेक्स स्कँडल मध्ये अडकण्याची शेनची पहिलीच वेळ नाही. याच कारणाने त्याचे पहिले लग्न मोडले होते आणि ऑस्ट्रेलिया टीमचे उपकप्तानपद त्याला सोडावे लागले होते. शेन सध्या पश्चिम लंडन मध्ये राहतो आहे.

Leave a Comment