सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत


स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने A-सीरिज मधील आणखी एक डिव्हाईस Galaxy A20s लाँच केला आहे. हा फोन मलेशिया आणि फिलिपिन्स बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6.5 इंचची इनफिनिटी वी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy A20s स्मार्टफोन याच वर्षी लाँच करण्याच आलेल्या  Galaxy A20 चा सक्सेसर आहे.

(Source)

सॅमसंगने केवळ एका व्हेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला असून, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 699 मलेशिया रिंगिट (जवळपास 12 हजार रूपये) आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि रेड या व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे.

गॅलेक्सी ए20एस मध्ये 1.8GHz ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला असून, हा अँड्रॉईड 9 पायबरोबर येतो. स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 13 मेगापिक्सल प्रायमेरी सेंसर, 120 डिग्री फील्ड ऑफ व्यू असणारा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असे ट्रिपल रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

(Source)

यात गॅलेक्सी ए20 प्रमाणेच 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्ज सपोर्टबरोबर येते.

Leave a Comment