सुमोनाचा हा अवतार बघुन तुम्ही देखील थक्क व्हाल…


कपिलची पत्नी म्हणून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेकदा दिसणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. आपल्या थायलंड दौऱ्यामधील काही फोटो सुमोनानेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. समोना बिकिनीमध्ये समुद्रकिनारी आराम करताना या फोटोंमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

Hello Sunday ⭐️💛🌼🌻

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on


सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुमोना सुट्ट्यांसाठी गेली आहे. इन्स्टाग्रामवर सुमोना प्रचंड सक्रिय असून ती अनेकदा सेटवरचे फोटोही पोस्ट करताना दिसते. तिने असेच थायलंडमधील फोटोही शेअर केले आहेत. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कायमच सोज्वळ भूमिका साकारणारी सुमोना चक्क बिकीनी लूकमध्ये या फोटोत दिसत आहे. तिच्या उजव्या पायावरील आकर्षक टॅटूही तिने पोस्ट केलेल्या फोटोतमध्ये दिसत असून या टॅटू संदर्भात तिच्या अनेक फॉलोअर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्ट केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये सुमोना स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसत आहे.


अशाप्रकारे बिकीनीमधील फोटो शेअर करण्याची सुमोनाची ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधीही अशाप्रकारचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.तिने इन्स्टाग्रामवर श्रीलंकेमध्ये फिरायला गेली असतानाही एक व्हिडिओ शेअर केला होता.


बालकलाकार म्हणून आमिर खान आणि मनिषा कोईरालाच्या लोकप्रिय ‘मन’ चित्रपटामध्ये काम करणाऱ्या सुमोनाने बर्फी, किक यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती चित्रपटानंतर छोट्या पडद्याकडे वळली. ‘कसम से’ मालिकेपासून आपल्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात करणारी सुमोना ‘कस्तुरी’, ‘नीर भरे तेरे नैना देवी’, ‘सपनो से भरे नैना’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘ये है इश्कीया’, ‘जमाई राजा’, ‘देव’ या मालिकांमध्ये दिसली.

Leave a Comment