रितेश-जेनेलियाच्या ट्विटर-वॉरने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष


मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांच्यात सुरु असलेले गोड भांडण आता ट्विटरवर आले आहे. जेनेलियासाठी एक मीम रितेशने ट्विट केल्यानंतर त्याला जेनेलिया काय उत्तर देणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. रितेशने प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते, असे मीम शेअर केला होता आणि त्यात त्याने जेनेलियाला टॅग केले होते. आता त्याच्या या मीमला जेनेलियानेही सडेतोड उत्तर दिले आहे.


मी ‘माझा नवरा काय बोलत आहे याकडे सर्वसामान्यपणे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो, अशी ओळ लिहिलेला मीम जेनेलियाने शेअर करत रितेशला त्यात टॅग केले आहे. जेनेलियाच्या या उत्तराने ‘शेरास सव्वाशेर’ असल्याचे सिद्ध केले असे म्हटले तर वावगे ठरु नये.


रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्याकडे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्यातील हे ‘मीम-वॉर’ पाहून त्यांचे चाहते देखील बुचकुळ्यात पडले आहेत. संसार म्हटले की भांड्याला भांडे हे लागतेच त्यात काही नवीन नाही. कधी ना कधी नवरा बायकोत खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात, याचीच प्रचिती रितेश-जेनेलिया यांचे भांडण पाहून येत आहे.

Leave a Comment