सेल सुरु होण्यापूर्वी आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन ११


नुकताच लाँच झालेला अॅपलचा आयफोन ११ भारतात सेल सुरु होण्यापूर्वीच आउट ऑफ स्टॉक झाल्याचे समजते. या फोनसाठी भारतात २० सप्टेंबरपासून प्री बुकिंग सुरु झाले होते आणि २७ सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरु होणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वीच आयफोन ११ ची सर्व युनिट फ्लिपकार्ट तसेच अमेझोनवर बुक झाली आहेत. प्री बुकिंग सुरु होताच अवघ्या ३ दिवसात ही युनिट बुक झाल्याचे समजते. या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीयामध्ये असलेली आयफोनची क्रेझ समोर आली आहे. अर्थात आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ मॅक्सची काही युनिट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

या आयफोन सिरीज मधील आयफोन ११ची बेस प्राईज ६४९०० रुपये असून ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज साठी आहे. त्याच फोनचे १२८ जीबी व २५६ जीबी व्हेरीयंटही उपलब्ध आहे. आयफोन ११ प्रो ची बेस प्राईज ६४ जीबी साठी ९९९९० तर मॅक्स साठी १.०९,९०० रुपये असून हे फोन २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरीयंट मध्येही मिळू शकणार आहेत.आयफोन ११ ब्लॅक, व्हाईट, लव्हेंडर, रेड, ग्रीन व यलो कलरमध्ये मिळणार आहे.

या फोनला ६.१ इंची एलसीडी आयपीएस एचडी डिस्प्ले दिला गेला असून हा फोन ए १३ बायोनिक प्रोसेसरने पॉवर्ड आहे. त्याला फेस आयडी सपोर्ट आहे आणि तो ३० मिनिटांसाठी २ मीटर खोल पाण्यात वॉटर रेझीस्टंट आहे.

Leave a Comment