ऑक्टोबरमध्ये तब्बल आठ दिवस होणार तळीरामांचे हाल


मुंबई : दसरा दिवाळी हे दोन्ही महत्त्वाचे सण येत्या ऑक्टोबर महिन्यात आहेत. सण म्हटले की, अनेकजण बाहेर पार्टी, नाईट आऊट करण्याचा प्लॅन करतात. तुम्हीही जर ऑक्टोबर महिन्यात मद्यप्राशन करण्याचा प्लॅन करत असाल. तर या दरम्यान तळीरामांची चांगलीच पंचाईत होऊ शकते. कारण तब्बल 8 दिवस येत्या ऑक्टोबर महिन्यात ड्राय डे असणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातील तळीरामांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

पहिला ड्राय डे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे. गांधी जंयती बुधवारी 2 ऑक्टोबरला असल्याने या दिवशी विदेशी मद्य, देशी दारू, ताडीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने दारुची दुकाने बंद राहतील. तसेच रविवारी 13 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती असल्याने दारुची दुकाने बंद राहणार आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी 48 तास मद्यविक्रीस मनाई करण्यात येते. त्यामुळे शनिवार 19 ऑक्टोबर, रविवार 20 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राज्यात मद्यविक्री होणार नाही. तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार असल्याने त्या दिवशीही दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी 27 ऑक्टोबरला नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने बंद राहणार आहेत.

Leave a Comment