रोनाल्डोला पछाडत मेस्सीने पटकावला ‘फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कार


मिलान – यंदाचा ‘फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा पुरस्कार फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकताना मेस्सीने पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पछाडले.

फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे इटलीच्या मिलान येथे आयोजन करण्यात आले होते. मेस्सीसोबत फिफा ‘बेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या शर्यतीत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. पण मेस्सीने या स्पर्धेत बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा ‘वुमन ऑफ द इयर’ चा पुरस्कार जिंकला आहे.

लिवरपुल संघाचे जर्गेन क्लॉप यांना या कार्यक्रमात फुटबॉल खेळातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. मागच्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चँम्पियन लीगचा किताब मिळवून दिला होता. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून लिवरपुलच्याच एलिसन बेकर याला गौरवण्यात आले आहे. एलिसन ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला गोलरक्षक आहे.

पुरस्कार आणि विजेते खेळाडू –
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू- लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/बार्सिलोना)
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू- मेगन रॅपिनो (यूएसए/रिजन एफसी)
सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक- एलिसन बेकर (ब्राझील/लिवरपुल)
सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर- साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/एटलेटिको मैड्रिड)
पुरुष प्रशिक्षक- जर्गेन क्लॉप(लिव्हरपूल)
महिला प्रशिक्षक- जिल एलिस (यूएसए)
पुरस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल- डॅनियल झेझोरी
फेअर-प्ले पुरस्कार- मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड

Leave a Comment