गुगलला जेनिफर लोपेझच्या त्या ड्रेसमुळे द्यावे लागले ‘फोटोज’चे फिचर


इंटरनेट क्षेत्रात होत असलेल्या क्रांती दरम्यान 2000 साली एक फोटो सर्वत्र फार चर्चेत होता, तो फोटो होता हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर जेनिफर लोपोजने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये घातलेल्या ड्रेसचा. वर्साचे या ब्रँडचा हिरव्या रंगाचा गाऊन सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. याची कमाल अशी की गुगलवर 2000 साली सर्वाधिक सर्च झालेला हा ड्रेस ठरला.

जे-लोने हाच ड्रेस घालून शुक्रवारी झालेल्या मिलान फॅशन विकमध्ये रॅम्पवॉक केले. तब्बल 19 वर्षांपूर्वीचा जेनिफरचा डॅशिंग लूक पुन्हा एकदा पाहून सर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या. गुगल त्यावेळी सर्च केल्यानंतर फक्त लिंक्सचाच ऑप्शन उपलब्ध होता, त्यामुळे युजर्सना प्रत्येकवेळी लिंकवर क्लिक करावे लागत होते. गुगलने यावर उपाय म्हणून चक्क एक नवे फिचर तयार केले, ‘गुगल इमेजेस’. गुगलसाठी गुगल इमेजेसचे फिचर फार फायद्याचे ठरले. आपल्याला आजही सहजरित्या गुगलवर फोटोजचे सेक्शन उपलब्ध असण्यामागे ही कहाणी आहे.

तब्बल 50 वर्ष जेनिफरचे वय आहे, तिचा फॅशन आणि स्टाईलिंगचा तोच अंदाज आजही तसाच आहे. वर्साचेच्या ग्रीन ड्रेसने जे-लोचा एव्हरग्रीन अंदाज सर्वांनाच ताजे करुन गेला. 19 वर्षांपूर्वी त्याचा इंटरनेटवर इतका प्रभाव दिसेल याचा अंदाज कुणालाच नव्हता, स्वत: जेनिफर लोपेजला देखील नव्हता. पण या फोटोने दाखवून दिले की युजर्स इंटरनेटचा कशा प्रकारे वापर करतात.

Leave a Comment