यामुळे जगभरातील नेत्यांवर भडकली ग्रेटा थनबर्ग


संयुक्त राष्ट्र संघात हवामान बदल थांबवण्यासाठी हवामान कृती परिषद सुरू असून आहे. १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने या परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर संताप व्यक्त केला. तुमच्या पर्यावरण संवर्धनासंदर्भातील पोकळ शब्दांनी माझे बालपण हिरावून घेतले असल्याचा आरोप ग्रेटा थनबर्गने केला आहे.

राष्ट्र संघाची न्यूयॉर्क शहरात जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी संयुक्त ‘युएन हवामान कृती परिषद’ आयोजित केली होती. जगभरातील नेत्यांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या परिषदेला हजेरी लावली आहे. सध्या सुरू असलेले प्रयत्न जागतिक हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर तोकडे आहेत, हे आपल्याला आधी स्वीकारावे लागेल. तसेच चर्चा करण्याचे दिवस संपले असून आता कृती करण्याची गरज असल्याचे मोदी या परिषदेत म्हणाले.

दरम्यान, स्विडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही परिषेदच्या सुरूवातीलाच या परिषदेत भूमिका मांडली. हे सर्व चुकीच होत आहे. मी येथे थांबायला नको. मी समुद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शाळेत जायला हवे. तुम्ही माझी स्वप्न आणि माझे बालपण तुमच्या पोकळ शब्दांतून हिरावून घेतले आहे. पण तरीही तुम्ही माझ्याकडे आशेने येतात. तुमची हिंमत कशी होते, असा सवाल थनबर्गने युनोच्या व्यासपीठावरून जगभरातील नेत्यांना केला.

Leave a Comment